कोकण रेल्वेचा नवा उपक्रम; रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात जाणार निर्यातक्षम माल

रत्नागिरी : रत्नागिरीसह कोकणातील फळे आणि मत्स्योत्पादने जगभरात निर्यात होतात. त्या दृष्टीने कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूक यंत्रणा तयार केली आहे. त्यामुळे आता निर्यातक्षम माल रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात पाठवता येणार आहे. गद्रे मरीन एक्स्पोर्ट कंपनीचे वीस पूर्णतः वातानुकूलित मिनी कंटेनर रेक रवाना करून या यंत्रणेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, गद्रे मरीन एक्स्पोर्टचे संचालक अर्जुन गद्रे यांच्यासह कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. कोकणातील निर्यातदारांबरोबरच आयातदारांनाही या सुविधेचा उपयोग होणार आहे. याआधी या सुविधेसाठी गोव्यातून उपलब्ध होणाऱ्या रेकवर अवलंबून राहावे लागत होते. आता ते अवलंबित्व संपले आहे. त्यामुळे कोकणातील मत्स्य आणि फळप्रक्रिया उद्योगांना याचा मोठा उपयोग होणार आहे. आयात-निर्यातदारांनी कोकण रेल्वेच्या या यंत्रणेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply