रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सुरू झाला अल्प दरातील वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष; उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : एमआयडीसीला लागून असलेल्या कोकणातील रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी येत्या महिन्याभरात सामंजस्य करार केला जाईल. जगातील चांगली रेल्वेस्थानके कोकणात तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करू या, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वातानुकूलित आलिशान प्रतीक्षा कक्षाचे (एसी एक्झिक्युटिव्ह लाउंज) उद्घाटन आज (२९ मार्च) संध्याकाळी त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

कोकण रेल्वेचा नवा उपक्रम; रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात जाणार निर्यातक्षम माल

रत्नागिरी : रत्नागिरीसह कोकणातील फळे आणि मत्स्योत्पादने जगभरात निर्यात होतात. त्या दृष्टीने कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूक यंत्रणा तयार केली आहे. त्यामुळे आता निर्यातक्षम माल रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात पाठवता येणार आहे.

शंभर टक्के विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वे हरित रेल्वे – अध्यक्ष

रत्नागिरी : कोकण रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण झाले असून, त्यामुळे प्रदूषण थांबले आहे. कोकण रेल्वे ही आता हरित रेल्वे झाली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली.

कोकण रेल्वेच्या अध्यक्षपदी संतोष कुमार झा

रत्नागिरी : संतोष कुमार झा यांची कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून ते येत्या १ एप्रिलपासून पदभार स्वीकारत आहेत.