कोकण रेल्वेच्या अध्यक्षपदी संतोष कुमार झा

नवी मुंबई : संतोष कुमार झा यांची कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून ते येत्या १ एप्रिलपासून पदभार स्वीकारत आहेत.

श्री. झा यांनी लखनौ विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात एमएस्सी आणि मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे. ते १९९२ च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी आहेत. कोकण रेल्वेच्या चेअरमनपदी नियुक्तीपूर्वी संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वेमध्ये ऑपरेशन आणि कमर्शियल विभागाचे संचालक म्हणून काम केले आहे.

श्री. झा यांना ऑपरेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये २८ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये ऑपरेशन्सचे प्रमुख पदही भूषवले आहे. लॉजिस्टिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यावसायिक युनिट्सचे नेतृत्व केले आहे. रेल्वे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यवसाय विकास भूमिकांमध्ये त्यांना १५ वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे. प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. प्रशिक्षण आणि राजभाषा विभागाने मिळवलेले यश आणि धोरणात्मक नियोजनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक हब, साइडिंग्ज आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स (पीएफटी) स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply