कोकण रेल्वेचा नवा उपक्रम; रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात जाणार निर्यातक्षम माल

रत्नागिरी : रत्नागिरीसह कोकणातील फळे आणि मत्स्योत्पादने जगभरात निर्यात होतात. त्या दृष्टीने कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूक यंत्रणा तयार केली आहे. त्यामुळे आता निर्यातक्षम माल रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात पाठवता येणार आहे.

उद्योजक – तुमचा हक्काचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार

एक्स्पोर्ट-इम्पोर्ट क्षेत्रात भारतातील उद्योजकांना प्रचंड संधी आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन, आंबा, काजू, कोकम, फणस या फळांपासून प्रक्रिया केलेली उत्पादने, खास कोकणी पदार्थ देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी हातभार लावू शकतात. त्याकरिता इन-टाइम एक्स्पोर्टसची मदत मिळू शकेल.