उद्योजक – तुमचा हक्काचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार

रात्री ऑफिस बंद करत असताना मोबाइल वाजतो. नामांकित बिस्लेरी कंपनीमधील अधिकारी फोनवर असतात. त्यांची अडचण अशी असते की इम्पोर्ट म्हणजे आयात केलेला माल कस्टम्समध्ये अडकला आहे आणि कारण म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेटमध्ये (आयईसी) काही त्रुटी आढळल्या आहेत. लागलीच ऑफिस कामाला लागते. सर्व पेपर तपासले जातात. अॅप्लिकेशन फाइल केले जाते आणि त्रुटी दूर करून नवीन सादर आयईसी सादर केले जाते. या तत्पर सेवेमुळे बिस्लेरी कंपनीचे आर्थिक नुकसानही टळते आणि वेळही वाचतो.

मित्रांनो, हा किस्सा आहे मुंबईतील गोरेगावमधील इन टाइम एक्स्पोर्ट्स या एक्स्पोर्ट कन्सल्टन्सी देणाऱ्या कंपनीचा.
श्री. विनय काशिनाथ जाधव यांनी मे 1988 मध्ये या कंपनीची स्थापन केली. विनय जाधव यांचा जन्म मुंबईचा असला, तरी श्री. जाधव कुटुंबीय मूळचे रत्नागिरीचे. नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाले. मात्र विनय जाधव यांचा कल व्यवसाय करण्याकडे होता. पाटकर कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवी, सोमैय्या इन्स्टिट्यूटमधून प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग झाल्यानंतर नोकरी मिळाली ती एका कंपनीतील सेल्स विभागामध्ये. त्याचवेळी इन्पोर्ट-एक्स्पोर्ट मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आणि त्याअनुषंगाने विविध नोकऱ्या पत्करत अनुभव घेतला. देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या इ्म्पोर्ट-एक्स्पोर्ट क्षेत्रातून देशसेवाही करावी, या हेतूने कंपनीची स्थापन झाली. मित्रांकडून काही रेफरन्स मिळाले. त्यातून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. प्रामाणिक आणि उत्कृष्ट सेवेमुळे विविध क्षेत्रांमधील ग्राहक जोडले जाऊ लागले.

तुमचा हक्काचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार अशी टॅगलाइन असणारी ही कंपनी एक्स्पोर्टसाठी पूरक विविध सेवा पुरविते. त्यात प्रामुख्याने फॉरीन ट्रेड पॉलिसीविषयी मार्गदर्शन ककरणे, एक्स्पोर्टसाठी आवश्यक सर्टिफिकेट म्हणजे आयईसी, आरसीएमसी मिळवून देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निर्यात करणाऱ्या एक्स्पोर्टर कंपन्यांना कच्चा माल आणि यंत्रसामग्री कस्टस्म्स ड्युटी फ्री इम्पोर्ट करण्यासाठी लायसेन्स मिळवून देणे अशा सेवांचा समावेश आहे. देशभरातील अनेक फार्मास्यूटिकल, इंजिनीअरिंग, केमिकल, ऑटोमोबाइल, टेक्स्टाइल कंपन्यांनी या सेवांचा लाभ घेतला आहे आणि ड्युटी फ्री लायसन्सच्या माध्यमातून 100 कोटी रुपये वाचविले आहेत.

श्री. विनय जाधव हे वर्ल्ड ट्रेड सेंटर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या प्रतिष्ठित संस्थांचे सभासद आहेत. सॅटर्डे क्लब गोरेगाव चॅप्टरमध्ये ट्रेझरर, त्यानंतर इंटरनॅशनल बिझिनेस सेलमध्ये वेस्टर्न सबर्ब रिजन हेड म्हणून त्यांचे योगदान आहे.

आज एक्स्पोर्ट-इम्पोर्ट क्षेत्रात भारतातील उद्योजकांना प्रचंड संधी उपलब्ध आहे. आपल्या कोकणभूमीला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन, आंबा, काजू, कोकम, फणस या फळांपासून प्रक्रिया केलेली उत्पादने, खास कोकणी पदार्थ हे सारे देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी आणि ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनण्यासाठी नक्कीच हातभार लावू शकतात. गरज आहे ती एकत्र येऊन श्रीमंत मानसिकतेने काम करण्याची!

त्यासाठी इन-टाइम एक्स्पोर्टस साह्य करण्यासाठी सदैव तत्पर आहेच. तुमचा हक्काचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार.
संपर्क – श्री. विनय का. जाधव
९८९२२५८०६६, ९९६७९१३५५५
www.intimeexportsadvisory.in

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply