मुंबई : ‘महाराष्ट्राने करोनाची रुग्णसंख्यावाढ रोखली असली, तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. मला पुन्हा कोणताही लॉकडाउन करायचा नाही; पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२२ नोव्हेंबर) केले. ते समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.
