मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा निर्विवाद विजय

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा सलग दुसऱ्यांदा पंधराच्या पंधरा जागांवर विजय मिळाला. अध्यक्षपदी संदीप चव्हाण यांची पुन्हा निवड झाली.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२०२८ या द्वैवार्षिक कार्यकारिणी निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने सलग दुसऱ्यांदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांनी ३६६ मते मिळवत पत्रकार संघाच्या इतिहासातील सर्वाधिक मतांचा विक्रम नोंदविला. त्यांचे प्रतिस्पर्धी विष्णू सोनवणे यांना १०८ मते मिळाली.

उपाध्यक्षपदी स्वाती संजय घोसाळकर (३२४) आणि राजेंद्र हुंजे (२८९) विजयी झाले. या पदासाठी संतोष गायकवाड (१३१), रवींद्र भोजने (१०१) आणि नितीन सोनवणे (९८) यांचा पराभव झाला.

कार्यवाहपदी शैलेश शिर्के (२७०) यांनी विजय मिळविला. मंगेश वरवडेकर यांना १०८, तर दीपक परब यांना ३७ मते मिळाली.

कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड(३३५) विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी कुलदीप धायवट यांना १३६ मते मिळाली.

विश्वस्तपदी प्रकाश कुलकर्णी (३११) विजयी झाले. अरविंद सुर्वे यांना १५० मते मिळाली.

कार्यकारिणी सदस्यांच्या नऊ जागांसाठी परिवर्तन पॅनेलचे गजानन सावंत (३०९), विनोद साळवी (२९१), आत्माराम नाटेकर (२८९), दिवाकर शेजवळकर (२८८), रजनीश राणे (२८४), अंशुमन पोयरेकर (२७६), सारंग दर्शने (२७४), राजेश खाडे (२७३) आणि किरीट गोरे (२६८) विजयी झाले. उमा कदम (१६९), नंदकुमार पाटील (१६८), आशीष बनसोडे (१६८), महेंद्र जगताप (१६५), काशिनाथ दहाड (१६४), श्रीकांत भोसले (१४७), केतन खेडेकर (१३४), नितीन सोनवणे (१०६) आणि अमृत सुतार (१७) यांचा पराभव झाला.

लोणावळा विश्रामधाम नूतनीकरणासह केलेल्या विकासकामांवर मतदारांनी दाखविलेला हा विश्वास असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी व्यक्त केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply