रॅन्कोज् कोकणात बंगला म्हणजे एक नैसर्गिक गावाकडचे घर…

उद्योजक

एक जाणती जीवनशैली…. निसर्गाशी समतोल राखून केलेला विकास…

रॅन्कोज् कोकणात बंगला ह्या आगळ्या वेगळ्या प्रकल्पामुळे अनेक ग्राहकांचे गावाकडील घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असा प्रकल्प जो तुमच्या सर्व आकांक्षा पूर्ण करेल. २००२ साली ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली असून आतापर्यंत आम्ही ३४२ पेक्षा जास्त बंगले ताब्यात दिले आहेत. तसेच आमचे ६ प्रोजेक्टचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करून ७ व्या प्रोजेक्टचे काम प्रगतिपथावर आहे. रॅन्कोज कोकणात बंगला ही केवळ कागदावरील संकल्पना नसून, प्रत्यक्षात दिलेली झाडांसाहित घरे आहेत.

सुरुवातीपासूनच आमच्या डोक्यात एक अशी संकल्पना होती की, एका कुटुंबामागे १० ते १२ झाडे लावली गेली पाहिजेत. आपण स्वतःहून झाडांना गोंजारून झाडांना वाढवत नाही तोपर्यंत झाडे वाढत नाहीत.. या संकल्पनेतून आधी NA (बिनशेती) प्लॉट्स, त्यामध्ये वास्तुशास्त्रानुसार घर, सभोवार झाडांच्या सुरक्षेसाठी दगडी कुंपण आणि एका कुटुंबाचा ऑक्सिजन निसर्गात परतफेड करण्यासाठी ८ ते १० झाडे.

एक चाकरमानी मुंबईमध्ये एवढी वर्षे काम करूनही गावाकडील त्याचे घर पूर्ण होत नाही. तो गुंतवणूक करतो, पण फसवला जातो. हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही NA भूखंडासहित बंगला म्हणजेच रॅन्कोज् कोकणात बंगला ह्या प्रकल्पाची सुरुवात केली.. त्यावेळी मार्केटमधील बरेचसे प्रकल्प अयशस्वी होते. त्यामुळे लोकांना विश्वास वाटत नव्हता की हे म्हणताहेत हे करून देतील का? आणि अशाच बऱ्याचशा गोष्टी…. सुरुवातीस एकदम खडतर परिस्थिती होती.

आम्ही ४५ बंगल्यांचा जो पहिला प्रोजेक्ट केला, तो आम्हाला पूर्ण करण्यासाठी पूर्णतः ७ वर्षे लागली. उद्देश असा की ती विश्वासार्हता जमवायची. पण त्याला खूप वेळ लागला आणि मग लोकांच्या विश्वासामुळे आणि प्रतिसादामुळे हळुहळू ही घरांची संख्या वाढत गेली. नंतर सगळे प्रकल्प जलद होत गेले. टायटल क्लिअर N.A. भूखंड पूर्णपणे टाऊन प्लानिंग अधिकृत नियमांनुसार.

आम्ही निसर्गाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही आम्ही रेनवॉटर हार्वेस्टिंग करत आहोत, ज्यामुळे विहिरींना भरपूर पाणी मिळते. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी ८ ते १० झाडे लावतो आणि त्यांची देखभाल करता यावी, अशी व्यवस्था करून देतो. संस्थेच्या माध्यमातून झाडांची देखरेख होते आणि आमचे ग्राहक देशात-परदेशात कोठेही असले, तरी त्यांचे निसर्गाचे देणे देण्याचे कार्य चालूच राहते. म्हणून प्रत्येक कुटुंबामागे झाडे लावली जावीत आणि प्राणवायूची निसर्गाला परतफेड करता यावी, यासाठीचा आमचा छोटा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आमच्या ग्राहकांच्या पिढ्यानपिढ्यांना “आरोग्यम् धनसंपदा” लाभेल.

आमची वैशिष्ट्ये :
* ६ प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण
* ३४२ बंगल्यांचा ताबा दिला.
 आणखी १२ + ५२ जणांना झाडांसहित घरकुल देण्याचे काम चालू करणार – सातव्या साइटवर.
* तुळस, आरोस तिठा, नाडकर्णी नगर, मोहोर, स्वामी समर्थ नगर, यशोदय नगर साइट पूर्ण.

आमचा प्रत्येक ग्राहक आमच्यापेक्षा ३ पटीने जास्त नफा मिळवतो. आम्ही लोकांना सांगतो की, ज्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, ती आधी विकण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही विकू शकला तरच विकत घ्या…

ठळक वैशिष्ट्ये :

१) बँक अप्रू्व्ह्ड प्रोजेक्ट २) वाजवी दारात देखरेख आणि सुरक्षा व्यवस्था
३) कुंपण, गेट ४) कलेक्टर अप्रूव्ह्ड प्रोजेक्ट ५) मुबलक पाणी
६) झाडांची लागवड, ७) सातबारा तुमच्या नावाने.
नोटाबंदी, Rera, GST सर्व असतानाही सहावा प्रोजेक्ट पूर्ण. कारण आमचे ग्राहक आपल्या संपत्तीत इतरांपेक्षा दुपटीने वाढ करत आहेत.

अपेक्षित ग्राहक :
ज्यांनी सोने, म्युच्युअल फंड, बँक, शहरातील फ्लॅट यामध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्यांच्यासाठी आजच वेळ आहे आपली गुंतवणूक सावंतवाडी रेल्वे टर्मिनस येथील रॅन्को समूहात करण्याची.. कारण हीच ठरणार आहे सर्वोत्तम गुंतवणूक.. कसे ?? आम्हाला व विचारा..

We Not Only Build Houses,
We are ENVIRONMENT–FRIENDLY HEALTHY HABITAT DEVELOPERS

सावंतवाडीमध्ये गुंतवणूक का करावी?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले आणि गोव्याच्या जवळचे ठिकाण म्हणजे सावंतवाडी. नुकत्याच होत असलेल्या रेल्वे टर्मिनसमुळे, जवळच समुद्रकिनारा आणि मंदिरे अशी पर्यटनस्थळे असल्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. भविष्यात येणाऱ्या चिपी आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळांमुळे नक्कीच याचे फायदे होतील. टूरिस्ट फॉरेन flight ने मुंबईत येऊन मग गोव्यात जातो. डिसेंबर २०२२ नंतर हाच टूरिस्ट मोपा एअरपोर्टवरून सावंतवाडी टर्मिनस येथे येऊन मग इतर ठिकाणी जाईल, असाही टक्का वाढणार आहे. म्हणून भविष्यातील विकासाचे आजच भागीदार व्हा!

निसर्गाच्या कुशीत आपल्या जिव्हाळ्याच घर……….!!
आपल्याच सावंतवाडीत…….!!
स्वप्न मनातले…निसर्गाच्या सान्निध्यातले..!!

Site Office Address : Yashoday Nagar, Behind kokan crown hotel,
Near church , Towards Sawantwadi aarondha road,
from Sawantwadi Railway station 1 km,
Nirwade, Sawantwadi, Sindhudurg.

Office address : Unit no. 2, 1st floor,
Goodwill Premises Co-op Soc.,
Swastik Indl. Estate, 178, Vidyanagri marg,
Santacruz (E), Mumbai – 400098
9969962862 / 8692049292

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply