‘आर्थिक चुका होऊ न देणे ही आमची जबाबदारी’

मी चंद्रकांत श्रीधर राऊत (सीएफपी, क्यूपीएफपी).

मी जुलै २००६ ते डिसेंबर २०१५ इन्शुरन्स कंपनीमध्ये (पहिली २ वर्षे बजाज अलायन्स आणि नंतर रिलायन्स लाइफ इन्शुरन्स) नोकरी केली. तिथे काम करताना माझ्या लक्षात आले की विविध प्रकारे फसवणूक करून पॉलिसी विकल्या जातात. फक्त कमिशन मिळवणे हाच त्यांचा उद्देश असतो. विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवून आपले आर्थिक उद्दिष्ट कधीच साध्य होऊ शकत नाही, त्यामुळे अनेकांची आर्थिक घडी मात्र विस्कळीत होते. हे मनाला न पटणारे होते, पण मी काहीच करू शकत नव्हतो.

त्याचदरम्यान मला एफपीएसबी, यूएसएच्या सीएफपी (सर्टिफाइड फायनान्शियल प्लानर) या कोर्सविषयी माहिती मिळाली. मी हा कोर्स मार्च २०१७ ला पूर्ण केला. त्याचबरोबर नेटवर्क एफपी, इंडिया या संस्थेचा क्यूपीएफपी (क्वालिफाइड पर्सनल फायनान्शियल प्लानर) हा कोर्ससुद्धा मे २०२० ला पूर्ण केला.

मी फायनान्शियल प्लानिंग तर करतोच, त्याबरोबर सर्वसामान्यांकडून आर्थिक चुका होऊ नयेत यासाठी फायनान्शियल अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून मार्गदर्शनदेखील करतो. हा प्रोग्राम आपल्याला शाळा, कॉलेज आणि कंपनी स्टाफ यांच्यासाठी, तसेच हाऊसिंग सोसायटी, सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी आयोजित करता येतो. मी यापूर्वी हिंदुस्थान युनिलिव्हर (एमआयडीसी, लोटे प्लँट), अनुयोग विद्यालय – मुंबई, स्वामी स्वरूपानंद विद्यालय (पावस, रत्नागिरी) इत्यादी ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या केला आहे.

मी ज्यांचे ज्यांचे फायनान्शियल प्लानिंग केले आहे, त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून अभिमान वाटतो. मंडळी, आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन न जमल्यामुळे, जगण्यासाठी अनेकांना आयुष्याच्या अखेरपर्यंत नोकरी किंवा व्यवसाय करावा लागतो.

काहींनी तर आयुष्यात खूप पैसे कमावले, परंतु काही चुकांमुळे म्हातारपणासाठी काहीच शिल्लक राहिली नाही. अनेकांना म्हातारपणात मुलांवर, नातेवाईकांवर अवलंबून राहावे लागल्यामुळे अपमानित आयुष्य जगावे लागते. हे मी बघितले आहे आणि म्हणूनच नोकरी सोडून फायनान्शियल प्लानिंग हे क्षेत्र निवडले.

आयुष्याच्या अखेरीपर्यंत स्वाभिमानाने जगावयाचे असल्यास वेळीच आर्थिक नियोजन करून स्वावलंबी व्हावे लागेल आणि त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी आहोतच. ज्याप्रमाणे आपल्या परिवारासाठी आपला विश्वासातील फॅमिली डॉक्टर असतो, आपण स्वकष्टाने कमावलेल्या लाखो रुपयांच्या गाडीसाठीसुद्धा नेहमीचाच ठरलेला मेकॅनिक असतो. साधे आपले केस कापायचे असतील तरीही केस कापण्यासाठी केशकर्तनालय ठरलेले असते, परंतु गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे झाल्यास आपण जवळच्या व्यक्तीचे ऐकतो ज्याने आधीच चुका केल्या आहेत आणि तुम्हालासुद्धा ती चूक करण्यास तो भाग पाडत असतो.

आपण तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेण्यास टाळाटाळ करतो. आपल्या परिवारासाठी तज्ज्ञ गुंतवणूक मार्गदर्शक असणे ही काळाची गरज आहे. परंतु तो कमिशनवर किंवा मोफत काम करणारा नसावा. कारण आपण सुज्ञ आहातच. तुम्ही आमच्याशी जोडले गेल्यावर तुमच्याकडून आर्थिक चुका होऊ न देणे ही आमची जबाबदारी आहे.

  • चंद्रकांत श्रीधर राऊत
    अर्थार्थनीती,
    रत्नागिरी
    (99204 75174)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply