रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ .पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे रत्नागिरीकरांसाठी नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पुन्हा निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे निःशुल्क योग शिबिर १ जुलै ते १५ जुलै २०२५ दरम्यान अरिहंत मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होणार आहे. दररोज सायंकाळी ५.३० वाजता हे शिबिर होणार असून याचा जास्तीत जास्त फायदा नोकरदारवर्गाला होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरी शहरातील विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी यांनी जराही वेळ न दवडता आरोग्य सुदृढ करणाऱ्या निःशुल्क योग शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी (७७९८४९०६१५) यांच्याशी संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

