Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

‘एक्स्प्लोर कोकण’तर्फे कोकण निसर्ग फोटो, व्हिडीओ स्पर्धा

Advertisements

रत्नागिरी : ‘एक्स्प्लोर कोकण’ या पर्यटनाशी निगडित संस्थेतर्फे कोकणातील निसर्गाचे व विविध पर्यटनस्थळांचे फोटो व शॉर्ट व्हिडीओ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी असेल.

निसर्गसौंदर्याने संपन्न कोकणातील भूप्रदेशाचे सर्वांनाच आकर्षण आहे. कोकणामध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येतात याच कोकणला पर्यटनदृष्ट्या अधिक ‘एक्सप्लोर’ करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेमध्ये कोणीही भाग घेऊ शकतो. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे अधिक लोकप्रिय आणि पर्यटनप्रिय आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील न पाहिलेली अथवा क्वचित पाहिली गेलेली अशी मात्र सुंदर साइट सीन अर्थात पर्यटनदृष्ट्या विकसित होणाऱ्या जागांचे, स्थळांचे फोटो काढून त्याची थोडक्यात माहिती पाठवणे अपेक्षित आहे. एक स्पर्धक कितीही फोटो आणि व्हिडीओ पाठवू शकतो. यामध्ये समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, जंगल सफारी, गडकिल्ले तसेच धबधबे डोंगर-दऱ्या आदी स्थळांचा समावेश होऊ शकतो. स्पर्धकाने लोकप्रिय स्थळे शक्यतो टाळून नव्या सुंदर स्थळांचे फोटो काढून ते संस्थेकडे पाठवावेत. ज्या स्पर्धकाला व्हिडीओ करावयाचा आहे त्यांनी जास्तीत जास्त ४० सेकंद ते एक मिनिटपर्यंत व्हिडीओ काढून सोबत त्या स्थळाची माहिती पाठवावी. भाग घेणाऱ्या स्पर्धकांने स्पर्धेला पाठवलेला फोटो अथवा व्हिडिओ स्वतःचाच असल्याचाही प्रकटन देणे आवश्यक आहे. कोणत्याही कॉपीराइट अथवा इतर फोटो घेऊन ते पाठवू नयेत.

हे फोटो अथवा व्हिडीओ हे व्हॉट्सअॅप नंबरवर अथवा मेल आयडीवर पाठवता येतील. सोबत आपली सर्व माहिती आणि संपर्क क्रमांक देणे गरजेचे आहे. स्पर्धकांनी १० ऑगस्ट २०२५ पर्यंत स्पर्धेचे फोटो आणि व्हिडीओ पाठवावेत. यामध्ये प्रत्येकी तीन क्रमांक निवडण्यात येतील. त्यांना अनुक्रमे ३०००, २००० आणि १००० रुपयांची पारितोषिके दिली जातील. विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान येणार आहे. याशिवाय दहा उत्तेजनार्थ क्रमांक निवडण्यात येतील. त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे.

स्पर्धकांनी आपले फोटो व व्हिडिओ ८८५५०४४२२५ या व्हॉट्सअॅप क्रमांक वर अथवा explore.kokan10@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत असे आवाहन एक्स्प्लोर कोकणतर्फे करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version