रत्नागिरी : सध्या सुरू असलेला श्रावण महिना आणि १९ ऑगस्ट रोजी येत असलेला जागतिक छायाचित्रण दिन यांचे औचित्य साधून रत्नागिरीतील लेन्स आर्ट या संस्थेतर्फे फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘श्रावणातले कोकण’ असा त्या स्पर्धेचा विषय आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली असून, कॅमेरा आणि मोबाइल अशा दोन विभागांत ती होणार आहे. १८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत फोटो पाठवायचे असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसांसह ई-सर्टिफिकेट्स दिली जाणार आहेत.
सध्या करोनामुळे बाहेर पडण्यावर निर्बंध असले, तरी श्रावण महिन्यामुळे निसर्गात असलेला अप्रतिम नजारा पाहून तो मोबाइलमध्ये किंवा कॅमेऱ्यात टिपायचा मोह प्रत्येकालाच होतो. प्रत्येकाच्या नजरेतून श्रावण महिना कसा दिसतो, हे आम्हाला पाहायचे आहे, असे आयोजकांनी आवाहनात म्हटले आहे. पर्यावरण आणि संस्कृती याचा ताळमेळ ठेवून साजरे केले जाणारे श्रावणातले सण, श्रावणात बहरणारा निसर्ग, विविध कलाकृतींनी नटलेला कोकण, आणि कोकणात राहणारी शहाळ्यासारखी गोड अंतरंगाची माणसे असा एकंदरीत सगळा श्रावण महिना आपल्याला सजवायचा आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे. लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळूनच या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी आलेल्या फोटोंचे छोटेखानी प्रदर्शन ऑनलाइन भरवता येऊ शकते का, यावरही संस्थेचा विचार सुरू आहे. स्पर्धेच्या दोन्ही विभागांतून प्रत्येकी तीन विजेते फोटो निवडण्यात येतील आणि त्यांना आकर्षक बक्षिसे, तसेच सगळ्या स्पर्धकांना ई-सर्टिफिकेट्स देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे नियम व अटी
- स्पर्धा दोन गटांत होईल – मोबाइल आणि कॅमेरा
- विषयाला साजेसा फक्त एकच फोटो दिलेल्या सोबत दिलेल्या गुगल फॉर्म लिंकवर पाठवावा.
- मोबाइलवरून काढलेल्या फोटोचे रिझॉल्युशन, आकार आणि दर्जा तपासून फोटो निवडला जाईल.
- फोटो पाठवण्यासाठी गुगल फॉर्म लिंक : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScueLG0kXbnCGrxmZS3MytsEAuQaUw4HHL5PR8CI8UzNERK-Q/viewform
- १८ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी तीन वाजता फोटो अपलोड करण्याची लिंक बंद करण्यात येईल.
- फोटो एडिट करताना मूळ विषयात कुठल्याही प्रकारचा बदल केल्यास फोटो ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- फोटोवर कुठल्याही प्रकारचा वॉटरमार्क अथवा लोगो नसावा.
- फोटोला बॉर्डर अथवा शॅडो इफेक्ट दिलेला नसावा.
- निवड आणि प्रदर्शनाबाबतचे सर्व हक्क लेन्स आर्ट कोअर टीमकडे राहतील.
- एका स्पर्धकाला फक्त एकाच ग्रुपमधून सहभागी होता येईल.
- वरील अटी पूर्ण न केलेले फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
नेत्रा आपटे : 9850999481
उपेंद्र बापट : 9881240824
सिद्धेश वैद्य : 9970245962
विवेक सोहनी : 9422474546
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड