से चीज… स्माइल प्लीज… क्लिक….!

आज (१९ ऑगस्ट) जागतिक छायाचित्रण दिन आहे. कॅमेरा हे केवळ माध्यम असून, छायाचित्र हे कॅमेऱ्यामागच्या नजरेत असते. छायाचित्रणतंत्रातील आधुनिकीकरणामुळे आज करोनाकाळातही आपले जगणे सुसह्य झाले आहे. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी घेतलेला या साऱ्याचा आढावा…

‘श्रावणातले कोकण’ या विषयावर ‘लेन्स आर्ट’तर्फे फोटोग्राफी स्पर्धा

रत्नागिरी : सध्या सुरू असलेला श्रावण महिना आणि १९ ऑगस्ट रोजी येत असलेला जागतिक छायाचित्रण दिन यांचे औचित्य साधून रत्नागिरीतील लेन्स आर्ट या संस्थेतर्फे फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्रावणातले कोकण असा त्या स्पर्धेचा विषय आहे.