रत्नागिरीतील रुग्णसंख्येने अडीच हजारांचा टप्पा ओलांडला; मृत्युसंख्या ९१

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत करोनाच्या तपासणीसाठी २१ हजार ३८० नमुने घेण्यात आले. त्यापैकी २५८० जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा माहिती कार्यालयाने आज (ता. १३) प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे. आज एकाच दिवशी १५३ जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात काल सायंकाळपासून ९३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५८० झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – रत्नागिरी २०, लांजा १, रायपाटण १, दापोली १२, कामथे १२, देवरूख १, कळंबणी १६, ॲन्टीजेन टेस्टमधील ३०.

आज मिळालेल्या माहितीनुसार आणखी चार करोनाबाधितांचा मृत्यू झाला. रत्नागिरीच्या उद्यमनगरातील ८३ वर्षीय महिला, लाला कॉम्प्लेक्स, रत्नागिरी येथील ५९ वर्षीय रुग्ण, माळ नाका, रत्नागिरी येथील ६५ वर्षीय रुग्ण आणि कोंडकारूळ (ता. गुहागर) येथील ३८ वर्षीय रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्युसंख्या आता ९१ झाली आहे.

आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून पाच, कोव्हिड केअर सेंटर, घरडा येथून सात, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथून चार, कोव्हिड केअर सेंटर, वेळणेश्वर, गुहागर येथून १०, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली येथून १२, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन येथून ८५, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे, चिपळूण येथील १७, माटे हॉल, चिपळूण येथून एका रुग्णाला घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमधील, तसेच इतर जिल्ह्यांत उपचार घेत असताना बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेल्या १२ जणांचा बरे झालेल्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १७६९ झाली असून, ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२० आहे. जिल्ह्यात २०२ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक विलगीकरणात १४७ जण आहेत.

मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्या होम क्वारंटाइन केलेल्यांची आजअखेरची संख्या ५१ हजार ७३८ आहे. परराज्यांतून आणि अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात १२ ऑगस्टअखेर एकूण दोन लाख ८० हजार ७१९ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यात तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या एक लाख १९ हजार ५५९ आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५५६ झाली असून, ३८७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन मेपासून सिंधुदुर्गात एक लाख ९७ हजार २५ नागरिक आले असून, २१ हजार ८३३ जण सध्या संस्थात्मक विलगीकरणात आहेत. सध्या जिल्ह्यात ५५ कंटेन्मेंट झोन आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply