Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळेत महिला शिकल्या नऊ पदार्थ

Advertisements

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये (BKVTI) २० सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटांतील महिलांनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला. उपवासाच्या वेळी तयार करता येतील अशा पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा नऊ पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात उपवासाची चटणी, पोटॅटो ट्रँगल, पोटॅटो पॉपकॉर्न, पोटॅटो स्किन फ्राइज, इडली, साबुदाणा सँडविच/पॅटीस, पोटॅटो ऑम्लेट, मिक्स भाजी, फ्रेंच फ्राइज अशा अनेक पदार्थांचा समावेश होता. पाककला तज्ज्ञांनी प्रशिक्षणार्थींना खास टिप्स व ट्रिक्स दिल्या. त्यामुळे त्यांना घरीही हे पदार्थ सहज बनवणे शक्य होणार आहे. उपवासाच्या पदार्थांची योग्य निवड आणि आवश्यक पौष्टिक घटकांचीही माहिती दिली.

‘या कार्यशाळेत सहभागी होणे हा खूपच उत्तम अनुभव होता. नुसत्या पारंपरिक रेसिपीच नाही, तर काही नवे आणि अनोखे पदार्थ शिकून आम्ही घरच्यांसाठी त्याची तयारी केली आहे. यामुळे नवरात्रौत्सव साजरा करत असताना आमच्या आहारात अधिक विविधता येणार आहे,’ अशी प्रातिनिधिक भावना प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली. या कार्यशाळेत BKVTIचे ट्रॅव्हल टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी विभागाचे प्रशिक्षक प्रसाद शेवडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा समारोप आनंदी वातावरणात झाला. नवरात्रीच्या निमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन केल्यामुळे या काळात उपवास करणाऱ्यांसाठी त्याचा उपयोग होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version