रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकन
Kokan Media
Advertisements
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातली सर्व १९ पोलीस ठाणी, चार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयं आणि रत्नागिरी मोटर परिवहन विभाग या कार्यालयांना आयएसओ 9001:2015 प्रमाणित स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकन प्राप्त झालं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते या प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कायदा सुव्यवस्था राखणं, जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं, नागरिकांना विविध सेवा प्रदान करणं, पोलिसांचे प्रशिक्षण, पोलिसांची कार्यक्षमता, संघ म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा अशा निकषांद्वारे पडताळणी केल्यानंतर हे मानांकन देण्यात आलं आहे.