नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांचे स्वच्छता अभियान

रत्नागिरी : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी आज राबविलेल्या स्वच्छता अभियानात १५०० सदस्यांनी सहभाग घेतला. त्यांनी ७०८ किलो ओला, तर १७ हजार १३७ किलो सुका कचरा सुमारे तीन तासाच्या अभियानात संकलित केला.

मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

नवी मुंबई : मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा. महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे, असे उद्गार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांनी काढले.