मुंबई : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २८ सप्टेंबर २०२० रोजी राज्य सरकारतर्फे ही घोषणा करण्यात आली. अशा प्रकारचे हे देशातील पहिले संगीत महाविद्यालय असेल.
