मराठा तरुणांनी स्वतःचे सोशल स्टेट्स घडवावे- डॉ. अमित बागवे

रत्नागिरी : सोशल मीडियावर दुसऱ्यांचे स्टेट्स बघण्याऐवजी स्वतःचे सोशल स्टेट्स घडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन बिझनेस काउन्सेलर, उद्योजक, तज्ज्ञ व्याख्याते डॉ. अमित बागवे केले.

रत्नागिरीत क्षत्रिय मराठा मंडळातर्फे गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा सत्कार

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे शनिवारी सायंकाळी (सात जून) माळनाका येथील देसाई बॅंक्वेट हॉलमध्ये ‘गौरव गुणवंतांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.