गावागावांत कारखाने निर्माण व्हावेत : कीर्तिकिरण पुजार

रत्नागिरी : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावांमध्ये छोटे उद्योजक तयार झाले आहेत. या सर्व योजनांचे रूपांतर करून एकत्रितपणे गावागावात कारखाने निर्माण करता येतील का, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी लवकरच कार्यशाळा घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.