रत्नागिरीच्या कन्येसाठी परदेशात पायघड्या; मराठी शाळेतून शिकून उत्तम गुणांनी ‘आयआयटी’तून इंजिनीअर

निश्चित उद्दिष्ट ठेवून त्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. याचेच एक उदाहरण रत्नागिरीतील गौरी गणेश सुर्वे हिने घालून दिले आहे. दहावीपर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली गौरी ‘आयआयटी कानपूर’ या देशातील नामवंत संस्थेतून उत्तम गुणांनी केमिकल इंजिनीअर झाली आहे. विशेष बातमी तर पुढेच आहे. भारतासह स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया या देशांतील नामवंत कंपन्यांनी ती प्रोसेस इंजिनीअर म्हणून आपल्याकडे यावी, म्हणून लाखो रुपयांचे पॅकेज देऊ करून अक्षरशः पायघड्या घातल्या आहेत.