चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे गुरुवारी सायक्लोथॉन

चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सलग पाचव्या वर्षी चिपळूण सायक्लोथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या गुरुवारी, दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता सायक्लोथॉन सुरू होणार आहे.