अलोरे (ता. चिपळूण) : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभाचे उद्घाटन केल्यानंतर पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकर समाजाने शतकानुशतके जोपासलेल्या चित्रकथी लोककलेचा प्रवास उलगडला.