रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यापैकी ४० हजार कोटींचे सामंजस्य करार रत्नागिरी जिल्ह्यासाठी आहेत. त्यामुळे २५ ते ३० हजार युवक-युवतींना आता रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (दि. २६ जानेवारी) येथे दिली.