रत्नागिरीतील १३०३ गावांमध्ये तीन वर्षे मलेरियाचा रुग्ण नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १३०३ गावांमध्ये गेल्या सलग तीन वर्षांमध्ये हिवताप अर्थात मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ही कीटकजन्य आजारमुक्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.