पाच-सहा पिढ्यांनंतर मराठीचे अस्तित्व धोक्यात -डॉ. सच्चिदानंद शेवडे

रत्नागिरी : इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे आणि पाश्चिमात्य चुकीच्या पायंड्यांमुळे पाच-सहा पिढ्यानंतर मराठीचे अस्तित्व धोक्यात येईल. त्याला आपणच जबाबदार असू, त्यामुळे आपणही सर्वांनी मराठी बोलू, वाचू, मराठीचा अभिमान बाळगू या, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.