गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे ३१ गुणवंतांचा गौरव

‘उद्योजकतेचा विकास करण्याचा ध्यास मराठी माणसांनी धरायला हवा. प्रामाणिकपणा हा उद्योजकाच्या वाढीसाठी एक महत्त्वाचा गुण आहे. एकमेकांच्या साह्याने, एकजुटीने यश मिळवता येते,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि नवलाई ग्रुपचे सर्वेसर्वा धर्मेंद्र सावंत यांनी केले. रत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ३१व्या वार्षिक गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.