रत्नागिरीतील सर्व रस्ते १४ तारखेपर्यंत खड्डेमुक्त होतील - नगराध्यक्षा

रत्नागिरीतील सर्व रस्ते १४ तारखेपर्यंत खड्डेमुक्त होतील – नगराध्यक्षा

रत्नागिरी : येत्या १४ सप्टेंबरपासून कोकणात मोठ्या उत्साहात
गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्याकरिता रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते त्या
दिवसापर्यंत खड्डेमुक्त होतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे
यांनी दिली.