ऑक्टोबर महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचा पंचनामा करण्यास शासकीय यंत्रणा अद्याप पोहोचली नसेल, तर शेतकऱ्यांनी स्वतः ऑनलाइन अर्ज भरून प्रशासनाकडे माहिती पाठवावी, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.