पर्यटन अणि शांतता विषयावर २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन

रत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून येत्या २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन टुरिझमद्वारे चालू वर्षाकरिता पर्यटन आणि शांतता हे जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य असून त्याअनुषंगाने पर्यटन दिन साजरा होणार आहे.