रत्नागिरी : येथील संगीत चळवळीसाठी अमूल्य योगदान असणारे गुरुवर्य कै. बाळासाहेब हिरेमठ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुरुवर्य विश्वाराध्य ऊर्फ बाळासाहेब हिरेमठ परफॉर्मिंग आर्टस् अॅकॅडमीतर्फे ‘स्वरपुष्पांजली’ मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि. ९ जानेवारी) सायंकाळी ७ वाजता गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर हा कार्यक्रम होणार आहे.