‘प्रतापगडावर अफझलखानाचा वध करताना शिवछत्रपतींनी गाजवलेल्या रौद्र पराक्रमानंतर हिंदवी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शत्रूला मोठा धाक बसला. आताच्या काळात भारताविरोधात अनेक देशांनी कंबर कसली आहे. त्याला तोंड देण्यासाठी शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे धडे आजही गिरवण्याची गरज आहे; मात्र त्यासाठी आधी त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेली उपासना नीट समजून घेण्याची गरज असून, नंतरच ते धडे गिरवण्यासाठी कार्यवाही करावी,’ असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी केले