बाबूराव जोशी गुरुकुलमध्ये भरली पालकांची शाळा

रत्नागिरी : येथील जीजीपीएस शाळेतील (कै.) बाबूराव जोशी पंचकोशाधारित गुरुकुल प्रकल्प आणि रा. भा. शिर्के प्रशालेतील (कै.) नानल गुरुकुल प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आगळ्यावेगळ्या पालकांची शाळा उपक्रमाचे आयोजन जोशी गुरुकुलमध्ये करण्यात आले. त्यामध्ये ७० पालक सहभागी झाले.

शिवछत्रपतींचा पराक्रम समजून घेऊन आज धडे गिरवण्याची गरज : चारुदत्तबुवा आफळे

‘प्रतापगडावर अफझलखानाचा वध करताना शिवछत्रपतींनी गाजवलेल्या रौद्र पराक्रमानंतर हिंदवी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शत्रूला मोठा धाक बसला. आताच्या काळात भारताविरोधात अनेक देशांनी कंबर कसली आहे. त्याला तोंड देण्यासाठी शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे धडे आजही गिरवण्याची गरज आहे; मात्र त्यासाठी आधी त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेली उपासना नीट समजून घेण्याची गरज असून, नंतरच ते धडे गिरवण्यासाठी कार्यवाही करावी,’ असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी केले

मठ येथील सोमेश्वर मंदिरात आफळेबुवा रंगविणार अफजल खान वधाचे आख्यान

लांजा : मठ (ता. लांजा) येथील भवानीसोमेश्वर मंदिरात येत्या १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत रुद्रानुष्ठान होणार असून त्यानिमित्ताने राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचे अफजल खान वधाच्या आख्यानविषयावरील कीर्तन होणार आहे.