वेंगुर्ल्यात समुद्रतळाशी युद्धनौकेमध्ये संग्रहालय; देशातील पहिल्या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुहूर्तमेढ

आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेत पाण्याखालील संग्रहालय आणि त्याभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ हा प्रकल्प होणार असून, याची मुहुर्तमेढ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (१० जून) रोवण्यात आली.

मुंबईतून तीन तासांत रत्नागिरी आणि साडेचार तासांत सिंधुदुर्गात आणणाऱ्या रो रो जलसेवेचा लवकरच प्रारंभ; क्रूझ किनारपट्टीवर दाखल

रत्नागिरी : ‘रस्ता, रेल्वेसोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार प्रयत्नशील असून, त्याचाच भाग म्हणून लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे जलद वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होतानाच नवा अध्याय राज्यात सुरू होईल,’ अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी दिली.