रत्नागिरीत लवकरच लोकनेते श्यामराव पेजे यांचे स्मारक – अजित पवार

मुंबई : कोकणच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असलेले कोकणपुत्र, लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक रत्नागिरीतील कुवारबाव येथे उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.