उतारवयात व्याधीमुक्तीसाठी योगाभ्यासाचे ज्येष्ठांना आवाहन

रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांनी उतारवयात मधुमेह, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल यासारख्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी औषधांऐवजी नियमित किमान एक तास तरी योगाद्वारे निरोगी जीवनाचा मूलमंत्र आचरणात आणावा, असे आवाहन कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या साईनगर येथे झालेल्या मासिक स्नेहमेळाव्यात अनुभवसंपन्न ज्येष्ठ नागरिकांनी केले.