पाच सप्टेंबरला रत्नागिरीत ‘नैसर्गिक शेती’ विषयावर कार्यशाळा

नैसर्गिक शेतीमधून विषमुक्त आधुनिक भारताची निर्मिती या विषयावरील शेती कार्यशाळा पाच सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील नाचणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

वडिलांच्या १२५व्या जयंतीनिमित्त नव्वदीतील देशपांडे यांनी सुरू केले मोफत आरोग्य सेवा केंद्र

आपल्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात ज्या सेवाभावाने कार्य केले, तो सेवाभाव स्वतःच्या वयाच्या नव्वदीतही जपण्याचे कार्य साईनगर-कुवारबाव (ता. जि. रत्नागिरी) येथील शांताराम सीताराम देशपांडे करत आहेत. आपले वडील कै. सीताराम नारायण देशपांडे (भाऊसाहेब) यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त श्री. शांताराम देशपांडे यांनी आपल्या घरी मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू केले आहे.