आताच्या काळातील मुले म्हणजे कचकड्याच्या बाहुल्या : बेतकेकर

रत्नागिरी : आताच्या काळात मुलांना आई-वडील प्रचंड सुरक्षित वातावरणात वाढवतात. मुलांची अतिकाळजी आणि अतिसंरक्षण यामुळे आजची मुले कचकड्याच्या बाहुल्या झाल्या आहेत, असे प्रतिपादन विद्याभारती शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप बेतकेकर यांनी केले.