सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्ताने १३ मे २०२५ रोजी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे.