जमिनीची फेरफार नोंद करण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच; मंडणगडमध्ये अधिकारी जाळ्यात

रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडणगडमध्ये केलेल्या कारवाईत दोन लाचखोर अधिकारी आणि एका शिपायाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तीस हजार रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आलं असून, त्याआधी त्यांनी ४५ हजार रुपयांची लाच ऑनलाइन स्वीकारली होती.