पूर्वजांनी तयार केलेली देवरायांची छोटीशी शाळा जोपासायला हवी – अर्चना गोडबोले

अलोरे (ता. चिपळूण) : गावागावांमध्ये असलेल्या देवराया म्हणजे पूर्वजांनी तयार केलेली पर्यावरणाची एक छोटीशी शाळाच होती. त्या देवराया तसेच जंगल वाचविण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन देवरायांच्या अभ्यासक आणि अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फौंडेशनच्या अध्यक्ष डॉ. अर्चना गोडबोले यांनी केले.