रत्नागिरी : ‘करोनाचे संकट एक-दोन महिन्यांसाठी नव्हे, तर वर्षभरही सुरू राहू शकेल. त्यासाठी आपली मानसिकता तयार केली पाहिजे. काया, वाचा आणि मनाचे तप या काळात प्रत्येकाने करणे आवश्यक आहे,’ असे मत रत्नागिरीतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे यांनी व्यक्त केले. करोना आणि ढासळत्या मानसिकतेविषयीच्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी पोलिसांच्या फेसबुक पेजवरून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे आणि वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सहभाग घेतला.
