रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सुरू झाला अल्प दरातील वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष; उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : एमआयडीसीला लागून असलेल्या कोकणातील रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी येत्या महिन्याभरात सामंजस्य करार केला जाईल. जगातील चांगली रेल्वेस्थानके कोकणात तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करू या, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वातानुकूलित आलिशान प्रतीक्षा कक्षाचे (एसी एक्झिक्युटिव्ह लाउंज) उद्घाटन आज (२९ मार्च) संध्याकाळी त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.