राज्य सरकारी कार्यालयांमध्ये जेवणाची सुट्टी फक्त अर्धा तासच आणि तीही दुपारी एक ते दोनमध्येच!

जेवणाची वेळ असल्याचे सांगून सरकारी कार्यालयात दुपारच्या वेळेत बराच काळ नागरिकांना रखडवले जाते. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारीही शासनाकडे गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, सरकारकडून या संदर्भातील चार जून २०१९ रोजीच्या शासन परिपत्रकाची पुन्हा एकदा आठवण करून देण्यात आली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून हे परिपत्रक पुन्हा प्रसिद्ध करण्यात आले आहे.