दीपक गद्रे यांना सॅटर्डे क्लबचा उद्योग महर्षी पुरस्कार

रत्नागिरी : येथील गद्रे मरीन एक्स्पोर्टचे संचालक दीपक गद्रे यांना सॅटर्डे क्लबतर्फे रत्नागिरी उद्योग महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या आठ जुलै रोजी रत्नागिरीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सॅटर्डे क्लबतर्फे सहाशे मराठी उद्योजकांचा मेळावा महिनाअखेर रत्नागिरीत

रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सहाशेहून अधिक मराठी उद्योजकांचा मेळावा रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. कोकणचा गौरवशाली अभियांत्रिकी वारसा सांगणारा इंजिनियर्स डे सेंटर्ड क्लबतर्फे आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.