तिसरी, चौथी, सहावीचा ‘सेतू’ अभ्यासक्रम – नियोजनाच्या सेतूअभावी पालकांना भुर्दंड!

तिसरी, चौथी आणि सहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाला सामोरे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी सुकर व्हावी यासाठी आणि जुन्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, यासाठी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा उपक्रम स्तुत्य असला, तरी या सेतू अभ्यासक्रमाची दीडशे पानांहून अधिक मोठी असलेली पुस्तके विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वतः छापून घ्यावी लागणार आहेत.