Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक सातवा)

Advertisements

भाद्रपद शुद्ध सप्तमी, शके १९४२

॥ श्रीराम ॥
जयाचें आठवितां ध्यान ।
वाटे परम समाधान ।
नेत्रीं रिघोनियां मन ।
पांगुळे सर्वांगी ॥ ७॥

अर्थ : गणपतीच्या सगुण रूपाचे चिंतन केले, तर मनाला मोठे समाधान वाटते. मग ते रूप प्रत्यक्ष पाहण्यासाठी मन डोळ्यांत एकवटते. त्याच्या बाकीच्या सर्व क्रिया बंद पडतात.

…….

१९ ऑगस्ट २०२०पासून भाद्रपद महिना सुरू झाला आहे. हा महिना गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने, त्यातील एकेक ओवी महिनाभर दररोज कोकण मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. सोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थही देण्यात येत आहे. गणेशस्तवनातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

……….

एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version