Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक २६वा)

Advertisements

भाद्रपद कृ. एकादशी, शके १९४२

॥ श्रीराम ॥
ध्यान गणेशाचे वर्णितां ।
मतिप्रकाश होय भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां ।
वोळे सरस्वती ॥ २६ ॥

अर्थ : गणपतीच्या उपासनेचे फळ असे आहे की, गणेशाच्या रूपाचे चिंतन केले, तर अज्ञानाने भ्रमित झालेल्या माणसाच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे वर्णन ऐकले, तर सरस्वती प्रसन्न होते.

…….

१९ ऑगस्ट २०२०पासून भाद्रपद महिना सुरू झाला आहे. हा महिना गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने, त्यातील एकेक ओवी महिनाभर दररोज कोकण मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. सोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थही देण्यात येत आहे. गणेशस्तवनातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

……….

एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version