स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा दिवाळी ठेव योजनेचा प्रारंभ

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा दिवाळी ठेव योजनेचा प्रारंभ रविवारी, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.

स्वरूपानंद पतसंस्थेने ४५५ कोटींच्या ठेवी, ३१७ कोटींचे कर्ज, २०१ कोटीच्या बँक गुंतवणुका अशी भक्कम आर्थिक स्थिती घेऊन दसरा दिवाळी ठेव योजना जाहीर केली आहे. या योजनेत गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक संस्थेमध्ये करावी, असे आवाहन अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

पतसंस्थेने आपले आर्थिक व्यवहार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व आर्थिक निकष सांभाळत वाढवत नेले असून संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कमालीचे सातत्य राखले आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते. २८ टक्क्यांपर्यंत भांडवलपर्याप्तता, ठेवी कर्जाचे ६३ टक्के आदर्श प्रमाण, एस.एल.आर. गुंतवणुकीचे २५ टक्के प्रमाण, निर्माण केलेल्या अन्य निधीची १०० टक्के गुंतवणुकीसह सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ५९ कोटी ३९ लाख एवढा भरवक्कम स्वनिधी अशी आर्थिक आकडेवारी ठेवीदारांना सुरक्षिततेची हमी देते. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी संस्थेने स्वरूपांजली ठेव योजना १६ ते १८ महिने सर्वसाधारण ८.२५ टक्के व ज्येष्ठ नागरिक / महिला ८.५० टक्के, सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) सर्वसाधारण ८.५० टक्के व ज्येष्ठ नागरिक / महिला ८.७५ टक्के या ठेव योजना घोषित केल्या आहेत. पतसंस्थेची ५० हजारांच्या घरात असलेली सभासद संख्या संस्थेचे जनमानसातील स्थान सांगण्यासाठी पुरेशी आहे.

पतसंस्थेच्या वरील ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करून ठेवीदारांनी स्वरूपानंद पतसंस्थेच्या स्वरूप अर्थ परिवारात सहभागी होऊन सुरक्षित आणि आकर्षक परताव्याचे लाभार्थी व्हावे, असे आवाहन संस्थेचे ॲड. पटवर्धन यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply