Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

दापोलीत ८ मे रोजी भारतरत्न पां. वा. काणे स्मारकाचा पहिला वर्धापनदिन

Advertisements

दापोली : येथे स्थापन झालेल्या महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीचा पहिला वर्धापनदिन येत्या ८ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विशेष गौरव समारंभही आयोजित करण्यात आला आहे.

महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारकाचे कामकाज जालगाव (ता. दापोली) येथे ७ मे २०२२ रोजी सुरू करण्यात आले. या स्मारकाला यावर्षी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन ८ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जालगाव येथील आम्रपालीच्या आमराईमध्ये स्मारकाच्या मागील बाजूस करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे हास्यकवी, अशोक नायगावकर यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांचा, तसेच दादा इदाते यांना पद्मश्री किताब मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. जालगावचे नवनिर्वाचित सरपंच अक्षय फाटक, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांचाही याच समारंभा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version